skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअश्विनी भिडेंना बढतीमुळे ‘हा’ पदभार काढून घेणार

अश्विनी भिडेंना बढतीमुळे ‘हा’ पदभार काढून घेणार

Ashwini Bhide Mumbai Metro,Ashwini, Bhide, Mumbai, Metroमुंबई : मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना राज्य सरकारने बढती दिली आहे. अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. कारशेडच्या बांधकामासाठी रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी रात्रीच्या वेळेस आरेत मोठे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉरही सुरू झाले होते. महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने भिडेंना बढती दिली. नंतर, व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्ता बदल झाल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने भिडे यांना पदोन्नती दिली.

मुंबई मेट्रो-३ चे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. कुलाबा ते सीप्झ या दरम्यान मेट्रो-३ धावणार आहे. या मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या आरे कारशेडच्या बांधकामावरून अश्विनी भिडे आणि पर्यावरणवादी संघटनांमध्ये वाद झाला होता. या वादात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली होती. आरेतील मेट्रोच्या कारशेडच्या बांधकामासाठी रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी रात्रीच्या वेळेस आरेत मोठे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉरही सुरू झाले होते. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल असा अनेकांचा अंदाज होता. अखेर तो अंदाज खरा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments