Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आज ८ हजार ६२३ नवे कोरोनाबाधित आढळले, ५१ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात आज ८ हजार ६२३ नवे कोरोनाबाधित आढळले, ५१ रुग्णांचा मृत्यू

maharashtra-reported-8623-new-covid-19-cases-and-51-deaths-in-last-24-hours

maharashtra-reported-8623-new-covid-19-cases-and-51-deaths-in-last-24-hours

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. आज ८ हजार ६२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. आज मृत्युंची संख्या ५१ आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज दिवसभरात राज्यात ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत २० लाख २० हजार ९५१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९४.१४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ४६ हजार ७७७ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ३ हजार ८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ७२ हजार ५३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात सीरम इन्स्टिट्युटची Covishield आणि भारत बायोटेकची Covaxin या दोन करोना लशींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरात सरकारतर्फे मोफत या लशींचं लसीकरण केलं जात आहे. सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना दिली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील करोनाची लस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे दर देखील सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments