Thursday, June 20, 2024
Homeमनोरंजनराहुलची गर्लफ्रेंड दिशा सोबत हेलिकॉप्टर राईड

राहुलची गर्लफ्रेंड दिशा सोबत हेलिकॉप्टर राईड

rahul-vaidya-shares-photo-with-girlfriend-disha-parmar-on-a-helicopter-ride-

rahul-vaidya-shares-photo-with-girlfriend-disha-parmar-on-a-helicopter-ride-

गायक राहुल वैद्य ‘बिग बॉस’ १४ मुळे चांगलाच चर्चेत आहे. राहुलची‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर वर्णी लागली नसली तरी या शोमधून राहुल वैद्यने अनेकांची मनं जिंकली. या शोमुळे राहुलची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास चार महिने ‘बिग बॉस’च्या घरात राहिल्यानंतर राहुल आता सुट्टी एन्जॉय करतोय.

‘बिग बॉस’ शोमध्ये राहुलने गर्लफ्रेंड दिशा परमारबद्दल खुलासा केला होता. तर तिच्या वाढदिवशी राहुलने लग्नासाठी प्रपोजही केलं होत. या शोदरम्यान दिशाने ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावत राहुलला लग्नासाठी होकार दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यातली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील आवडली होती.

राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत एक फोटो शेअर केलाय. या फोटोत राहुल आणि दिशा एका हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचं दिसून येतंय. फोटोला राहुलने खास कॅप्शन दिलंय.

 “चलो ले चलें तुम्हे तारों के शहर में… मुंबईपासुन काही दिवसांसाठी दूर माझ्या क्वीन सोबत” असं कॅप्शन राहुलने त्याच्या फोटोला दिलंय. यावरुन राहुल दिशासोबत काही दिवसांसाठी सुट्टी एन्जॉय करायला जात असल्याचं दिसतंय.

‘बिग बॉस’च्या शोनंतर राहुल वैद्यनं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. यासाठी दोघांनी तयारी देखील सुरु केलीय. लग्नसमारंभाचे प्लॅन्सही त्यांनी तयार केले आहेत.

अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडावा अशी राहुलची इच्छा आहे. अगदी 50 ते 60 पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार आहे. असं असलं तरी त्याच्या गेस्ट लिस्टमध्ये सलमान खानचं नावं पहिलं असेल अशी ईच्छा राहुलने व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी देखील राहुल आणि दिशाच्या जोडीला मोठी पसंती दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments