skip to content
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्रजळगाव: आयशर ट्रक उलटून भीषण अपघात; 16 मजूर जागीच ठार

जळगाव: आयशर ट्रक उलटून भीषण अपघात; 16 मजूर जागीच ठार

jalgaon-dhule-maharashtra-15-labours-died-on-the-spot
jalgaon-dhule-maharashtra-15-labours-died-on-the-spot

जळगाव: धुळे जिल्ह्यातील नेर येथून रावेरला पपई घेऊन जाणारा आयशर ट्रक मध्यरात्री किनगाव जवळ पलटी झाला. यावेळी ट्रक खाली दबून 16 मजूर जागीच ठार तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर होते अशी माहिती समोर आली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव नजीक हा अपघात घडला. यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक उलटा झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments