Tuesday, December 3, 2024
Homeदेशमहागाईचा भडका;पेट्रोल पाठोपाठ 'गॅस'चे दर भडकले!

महागाईचा भडका;पेट्रोल पाठोपाठ ‘गॅस’चे दर भडकले!

आज मध्यरात्रीपासून सिलिंडरसाठी मोजा जादा पैसे

lpg-price-hiked-by-rs-50-per-cylinder-from-midnight
lpg-price-hiked-by-rs-50-per-cylinder-from-midnight

मुंबई: देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे. आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) घरगुती वापराचा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता.

करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात.

तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहक आहेत.

आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) मुंबईत गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ होणार आहे. सध्या १४ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७१९ रुपये आहे. त्यात मध्यरात्रीपासून ५० रुपयांची वाढ होणार आहे.

एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments