Tuesday, December 3, 2024
Homeदेश“आंदोलक शेतकऱ्यांना हवी कोरोनाची लस द्या”, राकेश टिकैत यांची मागणी!

“आंदोलक शेतकऱ्यांना हवी कोरोनाची लस द्या”, राकेश टिकैत यांची मागणी!

delhi-farmers-protest-rakesh-tikait-demand-corona-vaccine-for-farmers-news-updates
delhi-farmers-protest-rakesh-tikait-demand-corona-vaccine-for-farmers-news-updates

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या ४ महिन्यांपासून कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलन स्थळांवर करोनासंदर्भातले नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क याविषयी चिंता व्यक्त केली जात असतानाच आता थेट आंदोलक शेतकऱ्यांकडूनच एक मागणी करण्यात आली आहे. “आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना करोनाची लस देण्यात यावी”, अशी मागणी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केली आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या टिकरी सीमारेषेवर शेतकरी आंदोलन करत असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.

आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या गेल्या ४ महिन्यांमध्ये झाल्या आहेत. मात्र, अद्याप या समस्येवर तोडगा निघालेला नाही. हमीभाव आणि इतर मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला आहे.

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलक बॅकफूटवर गेल्याचं म्हटलं जात होतं. आंदोलकांचे काही गट फुटून परत देखील गेले. मात्र, तरीदेकील मोठ्या संख्येने आंदोलक अजूनही दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत.

काय म्हणाले राकेश टिकैत?

मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलक एकाच ठिकाणी असल्यामुळे या आंदोलकांना करोनाची लस देण्याची मागणी टिकैत यांनी केली आहे. “करोना पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जे लोकं आंदोलनस्थळी बसले आहेत, त्यांना देखील व्हॅक्सीन दिली गेली पाहिजे. मी स्वत: देखील व्हॅक्सीन घेणार आहे. आंदोलन स्थळावर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहोत”, असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments