नवी दिल्ली: उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्त्यव्यानंतर सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांसहीत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.
महुआ यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री रावत यांनीच केलेलं वक्तव्य पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधालाय. “उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले, खाली पाहिलं तेव्हा गमबुट होते. वर पाहिलं तर… एनजीओ चालवता आणि कपडे गुडघे फाटलेले घालता. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा वर, खाली, पुढे, मागे सगळीकडे आम्हाला केवळ एक निर्लज्ज माणूस दिसला. एका राज्याची धुरा तुमच्या हाती आहे मात्र मेंदू फाटका आहे तुमचा,” अशा शब्दांमध्ये महुआ यांनी मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी तर स्वत:चा फोटो पोस्ट करत…
Ripped Jeans aur Kitab.
The country’s ‘sanskriti’ & ‘sanskaar’ are impacted by men who sit and judge women and their choices. Soch badlo Mukhyamantri Rawat ji, tabhi desh badlega. #RippedJeansTwitter pic.twitter.com/qYXcN88fY6— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 18, 2021
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर स्वत:चा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या रिप्ट म्हणजेच फाटक्या वाटणाऱ्या जीन्ससंदर्भात वक्तव्य केलं तशीच जीन्स घातलेला स्वत:चा फोटो प्रियंका यांनी पोस्ट केलाय. “रिप्ट जिन्स आणि पुस्तक. देशातील संस्कृती आणि संस्कारांना अशा पुरुषांपासून धोका आहे जे महिलांना आणि त्यांनी निवडलेल्या गोष्टींवरुन त्यांच्याबद्दलचं मत तयार करतात. मुख्यमंत्री रावतजी तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल,” असा टोला प्रियंका यांनी लगावला आहे.