ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. वयाच्या ४७व्या वर्षीही तितकीच हॉट आहे. आजही मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. मंदिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर मंदिराचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ चर्चेत आहे.
View this post on Instagram
मंदिरा दोन मुलांची आई आहे. पण ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क असते. मंदिरा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करते. पण आता मंदिराने बिकिनी परिधान करुन वर्कआऊट केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराची छोट्या भडद्यावर जादू
हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘बाथटब, बिकिनी आणि बँगिग वर्कआऊट’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या भडद्यावर जादू केली होती.
मंदिरा बेदीने १९९९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. अखेर २००१ मध्ये मंदिराने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने एका मुलीला दत्तक घेतले आहे.