Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातूनच भाजपाच्या अंताची सुरूवात होणार : शिवसेना

महाराष्ट्रातूनच भाजपाच्या अंताची सुरूवात होणार : शिवसेना

BJP's end will start from Maharashtra: Shiv Sena
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापना करणार हे निश्चित झालं आहे. मात्र भाजपचे नेते शिवसेनेवर टीका करत असल्यामुळे शिवसेनेकडूनही त्यांना प्रतिउत्तर दिले जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असे सांगून भाजपला डिवचले.

माध्यमांमध्येही राज्याच्या सत्तास्थापनेवरून उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे राऊत यांनी माध्यमांचाही समाचार घेतला. सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, अशी टीका केला. २०१४ मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मातोश्रीवर आल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती केली. भाजपानं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. असा इशाराही राऊत यांनी दिला.

राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी सामनातील संपादकीयचाही उल्लेख केला. आम्ही संपादकीय मधून सत्य मांडलं आहे. महाराष्ट्रात भाजपाला उभं करण्याचं काम शिवसेनेनं केलं, असंही राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसनेकडून सामनाच्या संपादकीय मधून केला आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही.

ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे. पयामुळे शिवसेना- भाजपात पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments