Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeदेशखातेदारकांना फटका : SBI बॅंक FD वरील व्याज दरात कपात करणार

खातेदारकांना फटका : SBI बॅंक FD वरील व्याज दरात कपात करणार

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयामुळे ४२ कोटी खातेधारकांना फटका बसला आहे. बँकेने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात कपात केली आहे. SBI मध्ये फिक्स्ड डिपॉझिट असेल, तर त्यावर आधीच्या तुलनेत आता कमी व्याज मिळणार आहे. यामुळे ग्राहकांच्या ठेवीवर मोठा परिणाम होणार आहे.

SBI ने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात १५ बेसिक पॉईंटची कपात केली आहे. SBI च्या या नव्या व्याज दरांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. SBI ने जारी केलेली नवीन व्याज दरं १० जानेवारीपासून लागू झाली आहेत. बँकेने ज्या मुदत ठेवीचा कालावधी १ वर्ष ते १० वर्ष असेल, अशा एफडीवर १५ बीपीएसची कपात केली आहे. तर ७ दिवसांपासून ते १ वर्षांपर्यंतचा कालावधी असलेल्या एफडीच्या व्याज दरांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवे व्याज दर…

SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ५० बेसिक पॉईंट व्याज दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता ७ ते ४५ दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना ५ टक्के व्याज, ४६ ते १७९ दिवसांच्या FD वर ६ टक्के, १८० ते २१० दिवस आणि २११ ते १ वर्षांच्या FD वर ६.३० टक्के व्याज देणार आहे. तर, १ ते २ वर्ष आणि २ ते ३ वर्षांच्या FD वर 6.60, 3 ते ५ वर्षांच्या FD वर ६.६० टक्के व्याज देईल. तसेच, ५ ते १० वर्षांच्या FD वरही ज्येष्ठ नागरिकांना ६.६० टक्के व्याज मिळणार आहे.

७ ते ४५ दिवसांच्या FD चे नवे व्याज दर ४.५ टक्के आहेत.

४६ ते १७९ दिवसांच्या FD चे नवे व्याज दर ५.५० टक्के आहेत.

१८० ते २१० दिवस, २११ ते १ वर्षांपर्यंतच्या दिवसांच्या FD चे नवे व्याज दरांमध्ये ०.२० टक्क्यांची कपात केली आहे. आता यावर ५.८० टक्क्यांनी व्याज मिळणार आहे.

१ वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या FD वरील व्याज दर.

१ ते २ वर्षांपर्यंतच्या FD वर ६.१० टक्के व्याज मिळेल.

२ ते ३ वर्षांपर्यंतच्या FD वर ६.१० टक्के व्याज मिळेल.

३ ते ५ वर्षांपर्यंतच्या FD वर ६.१० व्याज मिळेल.

५ ते १० वर्षांपर्यंतच्या FD वरही ६.१० टक्के व्याज मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments