Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशदिल्ली विधानसभा : ‘आप’ची ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी

दिल्ली विधानसभा : ‘आप’ची ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी

AAP

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप) मंगळवार ( १४ जानेवारी ) सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यांपैकी नवी दिल्ली मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पटपडगंज येथून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने यंदा ८ महिलांना उमेदवारी दिली आहे.

उमेदवारांच्या नावांची यादी अंतिम करण्यासाठी आपकडून मंगळवारी पॉलिटिकल अफेअर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाले. ‘आप’ने सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना मनिष सिसोदिया म्हणाले की, बैठकीत ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच १५ जागांवर विद्यामान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यंदा ६ महिलांना ऐवजी ८ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच ६ रिक्त जागांवरही नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. यंदा भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये मुकाबला होणार असून तिन्ही पक्षांनी दिल्ली काबीज करण्यासाठी जोरादार तयारी सुरु केली आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments