Placeholder canvas
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमंत्रिपद मिळालं नाही म्हणून रोहित पवार म्हणाले...

मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रोहित पवार म्हणाले…

Rohit Pawar

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमधील अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मात्र, नाराज आमदारांच्या संख्येत भर पडली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं. मंत्रिपद मिळालं नाही मी म्हणून नाराज नाही. नाराजी बाजूला ठेवून काम करायचं असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

रोहित पवारांना मंत्रीपद द्या अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत होती. रोहित पवारांनीही संधी मिळाली तर संधीचं सोनं करु असं सांगितलं होतं. परंतु मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे रोहित पवार नाराज झाले नाही. उलट त्यांनी जोमाने कामाल लागून काम करु असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे माजलगांवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे आमदार सोळंके यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments