Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरे 'या' कारणामुळे सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत

आदित्य ठाकरे ‘या’ कारणामुळे सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत

Aaditya Thackeray meets Sonia and Manmohan, invites them for Uddhav's swearing-inनवी दिल्ली : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीची राज्यात सत्तास्थापन होत आहे. आज गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना सोहळ्याचं आमंत्रण युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन दिलं.

आज गुरुवारी संध्याकाळी ६.४० वाजता उध्दव ठाकरेंचा, तसेच तिन्ही पक्षांमधील काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा होत आहे. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊन निमंत्रण दिलं. यावेळी सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींचे काँग्रेसचे आभार मानले. अशी माहिती आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना दिली. शपथविधीसोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येणार आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच सर्वत्र पोस्टर झळकत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments