मुंबई : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची महाराष्ट्र विकास आघाडी मिळून सत्तास्थापन करत आहेत. उद्धव ठाकरे आज गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उध्दव ठाकरेंना फोन करुन शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार संपूर्णपणे सहकार्य करेल असंही वचन दिलं. ही माहीती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. पत्रही पाठवलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं मात्र, मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
आज शपथविधीसोहळ्याचं जंगी तयारी सुरु असून देशातील व राज्यातील सर्व नेते, कलाकार,उद्योगपती, लेखक,कवी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. यामुळे या ऐतिहासीक सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.