Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमनोरंजनआलियाला ‘ती’ साडी तब्बल १७५ वेळा ‘का’ नेसावी लागली!

आलियाला ‘ती’ साडी तब्बल १७५ वेळा ‘का’ नेसावी लागली!

Alia Bhatt‘मूड के ना देख दिलबरो..’ या ओळींतून जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर माहेर सोडत असते तेव्हा एका पित्याची होत असलेली तळमळ सहज स्पष्ट होते. आलिया भट्टच्या आगामी ‘राजी’ या चित्रपटातील ‘दिलबरो’ गाण्यातील या ओळी आहेत. मुलीच्या लग्नात पित्याच्या आणि मुलीच्या मनातील घालमेल या गाण्यात शब्दबद्ध केली आहे. तितक्याच समर्पकपणे या गाण्याची सिनेमॅटोग्राफीसुद्धा केल्याचं पाहायला मिळतं. या गाण्याच्या मेकींगचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण आलियाला ‘बिदाई’च्या दृश्यातील साडी तब्बल १७५ वेळा नेसावी लागल्याचं ती या व्हिडिओत सांगत आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटाचे कथानक १९७१च्या पार्श्वभूमीची असून आलिया एका महिला गुप्तहेराची भूमिका पार पाडत आहे. लग्नानंतर तिला पाकिस्तानात जावं लागतं आणि हेच दृश्य चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शकांना बराच काळ लागला. तर संपूर्ण दृश्य चित्रीत होण्यापर्यंत आलियाला ती साडी १७५ वेळा नेसावी लागली. लग्नानंतर सीमा पार करून जात असतानाचे दृश्य चित्रीत करण्यासाठीही बरेच रिटेक घेण्यात आल्याचं विकी कौशल या व्हिडिओत सांगतो. विकी या चित्रपटात आलियाच्या पतीची भूमिका साकारत आहे.

कलाकारांच्या इतक्या मेहनतीचं चीज झाल्याचं हे गाणं पाहून नक्कीच लक्षात येतं. हे गाणं पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडाही पाणावतील हे निश्चित. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले असून शंकर एहसान लॉय यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्येच आलियाची रिअल लाईफमधील आई सोनी राजदान या दिसत असून त्यांच्या आणि आलियाच्या नात्याचंही सुरेख चित्रण केल्याचं पाहायला मिळत आहे. तर चित्रपटामध्ये आलियाच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणारे रजित कपूर हेसुद्धा एका खंबीर वडिलांच्या भूमिकेत शोभत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments