Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनसुनील ग्रोवर, सलमान खान सोबत झळकणार!

सुनील ग्रोवर, सलमान खान सोबत झळकणार!

Salman Khan, Sunil Groverप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात कॉमेडियन सुनील ग्रोवर मुख्य भूमिका साकारणार असल्याचं वृत्त समोर येताच आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सुनीलला जॅकपॉटच लागला असून तो बॉलिवूडच्या तीन खान पैकी एका खान सोबत भूमिका साकारणार आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील सलमान खानसोबत काम करणार असून त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात तो झळकणार आहे. सलमान आणि प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तो सलमानच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. सलमानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’ या कार्यक्रमासाठी सुनीलची निवड करण्यात आली. त्यामुळे सलमान आणि सुनीलमध्ये चांगली मैत्री झाली असून ‘भारत’मधील भूमिका त्यामुळेच मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

कॉमेडी शो सोबतच सुनीलने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘गजनी’, ‘हिरोपंती’, ‘गब्बर इज बॅक’ आणि ‘बागी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला. विशाल भारद्वाजच्या आगामी ‘छुरियाँ’ या चित्रपटात तो दंगल गर्ल सान्या मल्होत्रा, टीव्ही स्टार राधिका मदत यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे. आता अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटातही झळकण्याची संधी मिळाल्याने येत्या काळात चित्रपटांमध्ये सुनीलच्या अभिनयाचे नवे पैलू त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार हे नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments