skip to content
Tuesday, May 21, 2024
Homeमनोरंजन‘स्कॅम १९९२’मधील हर्षद मेहताच्या पत्नीचं झालं लग्न

‘स्कॅम १९९२’मधील हर्षद मेहताच्या पत्नीचं झालं लग्न

scam-1992-actress-anjali-barot-ties-the-knot-with-beau-gaurav-arora-
scam-1992-actress-anjali-barot-ties-the-knot-with-beau-gaurav-arora-

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री अंजली बरोटने नुकताच लग्न केले आहे. अंजलीने बॉयफ्रेंड गौरव अरोराशी लग्न केले आहे. अंजली आणि गौरव बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. आता सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी लग्न केल्याची माहिती दिली आहे.

‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्ये अंजलीने हर्षद मेहताची पत्नी ज्योतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. आता अंजलीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

अंजलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्री वेडिंग पासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत. अंजलीने १६ फेब्रुवारी २०२१ रोजी बॉयफ्रेंड गौरवशी लग्न केले. लग्नात अंजलीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लूकमध्ये अंजली सुंदर दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी अंजलीने मेहेंदी समारंभातील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने ‘रिस्क है तो इश्क है’ असे कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता अंजलीने लग्नातील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments