मुंबई: अभिनेता सलमान खान याला अभिनयाप्रमाणेच गाण्याची आणि चित्रकलेचीदेखील तितकीच आवड आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या गाण्याची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे.
Awkward embarrassed n yet delighted, honoured, privileged n over the moon to display my work amongst such great artist n legends like Raja Ravi Varma, Abanindranath Tagore, & VS Gaitonde. In all humility, thank u for the honour!@gitanjalimaini@googlearts @agpworld #AGPWorld https://t.co/0pQjNYGrE5
— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 26, 2021
“विचित्र, उदासीनता, अभिमान आणि आनंद असे सारे काही भाव सध्या जाणवत आहेत. माझं काम इतक्या मोठ्या दिग्गज राजा रवि वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर आणि व्ही.एस. गायतोंडे यांच्यासोबत डिस्प्ले होणार आहे. हा सन्मान देण्यासाठी मनापासून आभार”, अशी पोस्ट सलमानने शेअर केली आहे.
सलमानने मदर तेरेसा यांच्यावर आधारित एक चित्र रेखाटलं आहे. या चित्रावर त्याने स्वाक्षरीदेखील केली आहे. दरम्यान, हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात अनेक दिग्गजांचे चित्र ठेवण्यात आले आहेत.