साऊथ सुपरस्टार कमल हसन आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्यानंतर आता बॉलिवूड स्टार सैफ अली खाननेही करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. फोटोग्राफर वरिंदर चावलाने सैफचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 50 वर्षीय सैफ अली खानने आज करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्याने खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट असा पोशाख परिधान केला होता आणि तो रांगेत उभा राहून करोना लस घेण्याची प्रतिक्षा करत होता.
View this post on Instagram
यापूर्वी लस घेतलेले अभिनेते कमल हसन आणि सतीश शाह यांनी आपला लसीकरणादरम्यानचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सतीश शाह यांनी सांगितलं की, ही लस घेण्यासाठी त्यांना 3 तास उन्हात उभं राहून वाट पाहायला लागली होती. तर कमल हसन यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, लोकांनी लस घेण्यास लाजू नये. जेव्हा आपली पाळी येईल, त्यावेळी लस टोचून घ्यावी.
सैफ अली खान काही दिवसांपासून चर्चेत आहे ते त्याच्या लहान बाळामुळे. त्याची बायको करीना कपूर खान हिने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यांचा पहिला मुलगा तैमूर हाही कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो.
कामासंदर्भात बोलायचं झाल्यास सैफ सध्या ‘बंटी और बबली २’, ‘भूत पुलिस’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये काम करत आहे.