Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशऋषी कपूर यांच्या बहिणीचं कॅन्सरमुळे निधन

ऋषी कपूर यांच्या बहिणीचं कॅन्सरमुळे निधन

Rishi Kapoor Randhir Kapoor,Rishi Kapoor, Randhir Kapoor,Rishi, Randhir, Kapoor,riddhima kapoor,Riddhima kapoor sahani,Riddhima kapoor sahni,Ritu nanda,ritu,nandaनवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची बहीण आणि अमिताभ बच्चन यांच्या मुलीची श्वेता नंदाची सासू ऋतू नंदा यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्या ७१ वर्षांच्या होत्या. ऋषी यांची मुलगी रिद्धीमा कपूरने आत्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली.

रिद्धिमाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. आजपर्यंत ज्या लोकांना मी भेटले त्यातील सर्वात दयाळू आणि सज्जन तुम्ही होता. आता ते तुमच्यासारखं कोणी घडवत नाहीत. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’ रिद्धिमाच्या या पोस्टवर एकता कपूरने कमेन्ट करत ‘हृदयाला भिडणारा हा मेसेज होता’ असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

To the kindest most gentle person I‘ve ever met – They don’t make them like you anymore – RIP bua #missyoualways❤️🙏🏻

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात श्वेता बच्चन- नंदाचे सासरे रंजन नंदा यांचं निधन झालं होतं. रंजन यांच्या मृत्यूनंतरही रिद्धिमाने सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज लिहितं म्हटलं होतं की, ‘तुम्ही होता.. आहात आणि नेहमी लेजेन्ड राहणार. एवढं भरभरून प्रेम देण्यासाठी धन्यवाद.’

रणधीर कपूर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत ऋतू या कर्करोगाशी लढा देत असल्याचं सांगितलं होतं. दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. २०१३ मध्ये ऋतू यांना कर्करोग झाल्याचं कळलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments