Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी काँग्रेसचे संजय दौंड विरूध्द भाजपचे राजन तेली

विधान परिषदेसाठी काँग्रेसचे संजय दौंड विरूध्द भाजपचे राजन तेली

Sanjay Daund , Rajan Teli, NCP, Congress, Beed District

मुंबई : समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. या जागेवर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून राजन तेली यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी आणि भाजप दोघांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे. कुणाला संधी दिली जाणार, याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी दिली आहे. संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहे. या जागेसाठी २४ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. सध्या धनंजय मुंडे हे राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे विधानसभेत गेल्यानं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपानं राजन तेली यांना अगोदरच उमेदवारी दिली आहे.

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली. सुरूवातीला या जागेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पुढे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर दोन नावे चर्चेत होती. यात राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे आणि काँग्रेसचे संजय दौंड यांची नावे स्पर्धेत होती. त्यात संजय दौंड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या जागेवर काँगेसचे संजय दौंड यांना संधी….

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून उमेदवार असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी संजय दौंड यांनी प्रयत्न केले होते. दौंड व पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध आहेत. संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड हे मंत्री होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments