नवी दिल्ली – बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) १०० महिलांच्या यादीत समावेश केला आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर प्रियांका ९७ व्या स्थानावर आहे.
आपल्या हॉलिवूड प्रोजेक्ट्स आणि क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनच्या शूटिंगसाठी सध्या प्रियांका न्यूयॉर्कमध्येच आहे. प्रियांका पहिली अशी भारतीय अॅक्टर आहे, जी अमेरिकन टेलिव्हीजन ड्रामामध्ये लीड रोल करत आहे. तसेच ती सर्वाधिक मानधन मिळवणारी टीव्ही अॅक्ट्रेसही आहे. या यादीत प्रियांकासह भारतातील ५ महिलांची नावे देखील आहेत. भारतीय महिलांपैकी चंदा कोचर यांचे स्थान सर्वात वर आहे.
त्या ५ भारतीय महिला
चंदा कोचर – ३२ (डायव्हर्सिफाइड)
रोशनी नडार मल्होत्रा – ५७ (टेक्नॉलॉजी)
किरण मजूमदार शॉ – ७१ (हेल्थकेअर)
शोभना भरतिया – ९२ – मीडिया अँड एंटरटेनमेंट
प्रियांका चोप्रा – ९७ – एंटरटेनमेंट
टॉप ५ पॉवरफुल महिला
अँजेला मर्केल – १ (पॉलिटिक्स)
थेरेसा मे – २ (पॉलिटिक्स)
मेलिंडा गेट्स – ३ (एनजीओ)
शेरिल सैंडबर्ग – ४ (टेक्नॉलॉजी)
मेरी बारा – ५ (टेक्नोलॉजी)