skip to content
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजनइनायत शर्मा म्हणते,‘बाथटबमधील सीन्स साडी-चोळीत करावा काय?’

इनायत शर्मा म्हणते,‘बाथटबमधील सीन्स साडी-चोळीत करावा काय?’

हसीना : द क्वीन ऑफ हार्ट’ हा बॉलिवूडमधील एक सेक्स कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. मात्र चित्रपटात अश्लीलतेचा एवढा भडिमार करण्यात आला की, सीबीएफसीने यास प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माते विक्की रानावात प्रचंड भडकले असून, आता ते पुढे काय पाऊल टाकणार याची सर्वच प्रतीक्षा करीत आहेत. वास्तविक त्यांच्याकडे सध्या दोनच पर्याय उरले आहेत. एक म्हणजे सेन्सॉर बोर्डाने सांगितल्यानुसार चित्रपटातील काही सीन्सवर कात्री चालविणे अन्यथा सेन्सॉरच्या निर्णयाविरोधात ट्रिब्यूनल अर्ज दाखल करणे. सेन्सॉरच्या निर्णयावर केवळ निर्मातेच नाराज नसून, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्रीही जाम संतापली आहे. 

सेन्सॉर चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्याने तिच्या संतापाला पारावार उरला नसल्याचे समजते. होय, अभिनेत्री इनायत शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. इनायतने आमीर खानचा भाऊ फैजल खानच्या अपोझिट ‘चिनार दास्तान-ए-इश्क’ या चित्रपटात काम केले आहे. हा तिचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होता. आता ती या सेक्स कॉमेडी चित्रपटातून आपल्या अदा दाखविणार आहे. स्पॉटबॉयशी बोलताना इनायतने म्हटले की, ‘तर काय बिघडले जर मी चु… शब्दाचा प्रयोग केला? हा शब्द तर हल्ली सर्रासपणे वापरला जातो. त्यामुळे हा शब्द म्हणजे खूप मोठी शिवी आहे, असे मला वाटत नाही. जर काही सीन्सची डिमांड असेल की, मी बाथटबमध्ये सीन द्यावा तर मी याठिकाणी साडी-चोळी तर घालून जाऊ शकणार नाही.

इनायतने पुढे बोलताना म्हटले की, ‘मी या चित्रपटात एका ठग महिलेची भूमिका साकारत आहे. जी तरुण मुलांना पसंत करते, अशात जर एखादा मुलगा माझ्या पायांवर हात फिरवित असेल तर त्या काय बिघडले? इनायतच्या या बोल्ड वक्तव्यांमुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली असून, तिच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे. इनायत चित्रपटात अतिशय बोल्ड भूमिकेत असून, मी स्क्रीप्टच्या डिमांडनुसारच अशाप्रकारचे सीन्स दिल्याचे तिने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments