Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनजॉन अब्राहम मला ब्लॅकमेल करीत आहे- प्रेरणा अरोरा

जॉन अब्राहम मला ब्लॅकमेल करीत आहे- प्रेरणा अरोरा

john abraham, Prerna Aroraअभिनेता जॉन अब्राहमच्या जेए एंटरटेन्मेंट आणि क्रिआर्ज एंटरटेन्मेंटमधील वाद वाढतच असताना दिसत आहे. जॉन आणि डायना पॅँटी स्टारर ‘परमाणू’ हा चित्रपट ८ डिसेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जॉन अब्राहमच्या जेए फिल्म्सने क्रिआर्ज एंटरटेन्मेंटला कायदेशीर नोटीस बजावली होती. क्रिआर्जतर्फे आपली बाजू मांडण्यासाठी प्रेरणा अरोरानेदेखील जेए एंटरटेन्मेंटला उत्तर दिले आहे.

त्याचबरोबर जॉनवर काही आरोपही केले आहेत.  प्रेरणा अरोराने म्हटले की, हे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा जॉनने लाइन प्रोडक्शनमध्ये काम केले आहे. त्याने या अगोदरही हे काम केल्याचे त्याचे म्हणणे पूर्णत: खोटे आहे. जॉनने असे म्हटले होते की, २०१२ मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ आणि २०१३ मध्ये आलेल्या ‘मद्रास कॅफे’मध्ये त्याने लाइन प्रोडक्शनसोबत काम केले आहे. मात्र त्यानंतर आमच्या लक्षात आले की, त्याने कधीही लाइन प्रोडक्शनसोबत काम केले नाही. जॉनच्या प्रकरणात मी अशी व्यक्ती होती जिने जॉनला दिग्दर्शक अभिषेक शर्माची भेट घालून दिली. तसेच त्याला एक चांगली कथाही दिली. त्यावेळी दिग्दर्शक माझ्याकडे दुसºयाच अभिनेत्यांना घेऊन आले होते. अभिषेक शर्मा ही कथा २०१६ मध्ये आलेल्या ‘रूस्तम’सोबत लिहीत होते. त्यांची अशी अपेक्षा होती की, आम्ही ‘परमाणू’ची निर्मिती करावी. त्यासाठी त्यांच्या दुसºयाच अभिनेत्याचे नाव होते. त्यावेळी जॉन माझा चांगला मित्र होता. त्याचवेळी आम्ही लॉन्ग टर्म डील केली होती. त्यामुळेच मी त्याला हा चित्रपट दिला होता. याचदरम्यान, त्याने लाइन प्रोडक्शनमध्येही रस दाखविला होता. त्यासाठी त्याने त्याच्या आवडीच्या लेखकांची निवड केली. जॉनने म्हटले होते की, मी या चित्रपटाचा बजेट तयार करतो. पुढे बोलताना प्रेरणाने म्हटले की, जॉनने आम्हाला योग्य बजेट दिले नाही. एकेदिवशी त्याने आम्हाला ३५ कोटींचे बजेट दिले. ज्यामध्ये १० कोटी प्रिंट्स आणि जाहिरातीसाठी होते. यादरम्यान मी दोन स्टुडिओमध्ये गेली होती, जिथे सेटलाइट, डिजिटलविषयी मी चर्चा केली. जेव्हा मी त्यांना ३५ कोटी रुपयांच्या बजेटविषयी सांगितले तेव्हा मला सगळ्यांनीच नकार दिला. सगळ्यांनीच सांगितले की, जॉनची ही मार्किटेबिलिटी खूपच एक्सपेंसिव आहे. मला सांगण्यात आले की, हा चित्रपट २८-२९ कोटी रुपयांमध्ये बनविणे योग्य आहे. पुढे हीच बाब मी जॉनला सांगितली. जॉनवर आरोप करताना प्रेरणाने म्हटले की, जॉनने इंटलएक्चुअल प्रॉपर्टी राइट्सप्रकरणी माझी फसवणूक केली. प्रेरणाने आरोप केले की, जॉनने मला नेहमीच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘परमाणू’ २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र त्याने प्रदर्शनाची तारीख २ मार्च ठेवली. यामुळे झी स्टुडिओला खूप नुकसान सहन करावे लागले. कारण जॉनने त्यांना एकही गाणे पाठविले नव्हते. आम्ही त्यांना चार कोटी रुपयांमध्ये म्युझिक विकले होते. आता आम्ही सातत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यासाठी भांडत आहोत. दरम्यान, प्रेरणाच्या या आरोपांनंतर जॉनकडून काय प्रतिक्रिया दिली जाईल, हे बघणे मजेशीर ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments