Placeholder canvas
Thursday, May 9, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबादच्या हडकोत वाळू साठ्यात मृतदेह आढळला!

औरंगाबादच्या हडकोत वाळू साठ्यात मृतदेह आढळला!

Aurangabad, dead bodyमहत्वाचे…
१. हडको येथील रिकाम्या जागेत टाकलेल्या अवैध वाळू साठ्यात मृतदेह आढळला
२. हडको एन – १२ येथील राष्ट्रवादी भवन शेजारी वाळू साठ्याचा अड्डा
३. फावड्याने वाळू काढत असताना मृतदेह दडलेला आढळून आला


औरंगाबाद : हडको येथील रिकाम्या जागेत टाकलेल्या अवैध वाळू साठ्यात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एकर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. 

मृताचे नाव समाधान किसन मस्के असे आहे. तो सिडको एन-११ येथील रहिवासी आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हडको एन-१२ येथील राष्ट्रवादी भवन शेजारील जागेत शेख राजू हा अवैध रित्या वाळू साठा करतो. या वाळू साठ्यातील वाळू नेण्यासाठी आज सकाळी शेख यांचे मजूर आले होते. यावेळी फावड्याने वाळू काढत असताना त्यांना त्यात एक मृतदेह दडलेला आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. माहिती मिळताच एसीपी नागनाथ कोडे व पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहास उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments