Thursday, June 20, 2024
Homeमनोरंजनपरिणीतीला हिरोईन बनण्यात नव्हता इंटरेस्ट!

परिणीतीला हिरोईन बनण्यात नव्हता इंटरेस्ट!

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या जाम आनंदात आहे. तिच्या या आनंदामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे, तिचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट रिलीज झालायं आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३३ कोटी कमावले आहेत. दुसरे कारण म्हणजे आज (२२ ऑक्टोबर) परिणीती आपला २९ वा वाढदिवस साजरा करतेय.

प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज परी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण खरे सांगायचे तर बॉलिवूडमध्ये येण्याचा परिणीतीचा कुठलाही इरादा नव्हता. हिरोईन होण्याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. चेह-यावर मेकअप थोपणे परिणीतीला जराही आवडायचे नाही आणि त्यामुळेच हिरोईन बनण्याची तिची इच्छा नव्हती. इव्हेस्टमेंट बँकिंगमध्ये करिअर करण्याचे परिणीतीने आधीपासूनच ठरवून टाकले होते. आपल्या याच ध्यासापोटी तिने मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. येथे परीने बिझनेस, फायनान्स व इकॉनॉमिक्समध्ये आॅनर्स डिग्री घेतली. पण २००९ मध्ये परिणीतीला रिसेशनमुळे भारतात परतावे लागले. भारतात आल्यावर परिणीतीला यशराज बॅनमध्ये पब्लिक रिलेशन कन्सलटन्ट म्हणून नोकरी मिळाली. पण ही नोकरीच परिणीतीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

यशराज बॅनरच्याच ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात परिणीतीला संधी मिळाली. या चित्रपटात ती रणवीर सिंगच्या अपोझिट दिसली होती. या चित्रपटाने केवळ बॉक्सआॅफिसवरच धमाका केला नाही तर या चित्रपटातून परिणीतीचीही बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. या चित्रपटानंतर परिणीतीने कधीच मागे वळून बघितले नाही. यानंतर ‘इशकजादे’,‘हंसी तो फंसी’,‘किल दिल’, ‘दावत ए इश्क’, ‘मेरी प्यारी बिंदू’ अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले.

परिणीती केवळ अभिनेत्रीच नाही तर तिने शास्त्रीय संगीताचेही धडे घेतले आहेत. संगीतात तिने पदवी केली आहे. ती लहानपणानपासून स्टेजवर परफॉर्मन्स देत आलीय. चित्रपटांत येण्यापूर्वी परिणीतीचे वजन खूप जास्त होते. पण परिणीतीने केवळ वजन कमीचं केले नाही तर स्वत:ला मेंटेनही ठेवले. मी दुस-या कुठल्या प्रोफेशनमध्ये असते तर मला हा इतका खटाटोप करण्याची गरज भासली नसती, असे परिणीती म्हणून चुकली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments