पुणे: पुण्यातल्या धायरी परिसरातील कुदळे मळा या ठिकाणी अडीच वर्षांच्या चिमुकलीचं रात्री घरातून अपहरण करून खून तिचा करण्यात आला. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली.
पुण्यातला धायरी परिसर अपहरण, बलात्कार आणि खूनाच्या धक्कादायक घेटनेनं हादरून गेलाय. या संतापजनक घटनेनं पोलिसांच्या अब्रूची लख्तरं वेशीवर टांगलीयत. धायरी परिसरातल्या कुदळे मळा इथं एका घरातून अडीच वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झालं. अपहरणाची पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांची शोधाशोध केली पण रात्री पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. आणि रात्रच या चिमुकलीसाठी काळरात्र ठरली. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चिमुकलीचा मृतदेह सापडला. त्या नराधमानं तिचा जीव घेण्याआधी तिच्यावर बलात्कार केला होता. घटनेची माहिती मिळताच आमदार आले. पोलीस बळ कमी पडत असल्याचं सांगत निघून गेले.
घराबाहेर पडलेल्या महिला सुरक्षित नाहीत, हे वारंवार समोर आलंय. पण चिमुकल्या मुली घरातून उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार होत असेल तर नराधमांची हिंमत किती वाढलीय हे यातून अधोरेखित होतंय. पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतलंय. त्याचा तपास होईल. पण पोलस नावाची यंत्रणा ही फक्त बलात्काराचा तपास करण्यातच धन्यता मानणार असेल तर बलात्कार रोखायचे कोणी आणि आपल्या आया बहिणींची सुरक्षा करायची कोणी हा प्रश्न आहे.