महत्वाचे…
१. पद्मावतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो २.मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी केंद्राला लिहीले पत्र ३. चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड झाल्याचा आरोप
उत्तरप्रदेश : पद्मावतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं पत्र खुद्द योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारला लिहिलंय. पद्मावतीला राजपुत करणी सेनेनं तीव्र विरोध केलाय. पण आता उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच केंद्राला पत्र लिहिलंय.
राज्य सरकारच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांना पत्र लिहिलं आहे. चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.
दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने ‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडत कोणीही हा चित्रपट रिलीज होण्यापासून रोखू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे. एक महिला म्हणून या चित्रपटाचा भाग असणं, आणि ही कथा लोकांसमोर मांडण्यात मला गर्व वाचत आहे. जो सांगण्याची गरज नाही असं दीपिका पादुकोण म्हणाली.