Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनमिर्जा गालिब जयंती निमित्त, गुगलनं केलं डूडलव्दारे अभिवादन!

मिर्जा गालिब जयंती निमित्त, गुगलनं केलं डूडलव्दारे अभिवादन!

मुंबई : शेर-ओ-शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालिब यांची आज २२० वी जयंती आहे. हे निमित्त साधत गूगलने खास डूडल तयार करून मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्जा गालिब यांचं पूर्ण चित्र असे अत्यंत मनमोहक या डूडलचे स्वरुप आहे.

मिर्झा गालिब यांचं पूर्ण नाव मिर्झा असल-उल्लाह बेग खां २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते. मिर्जा गालिब यांनी पारसी, उर्दू आणि अरबी भाषेत अभ्यास केला.  त्यावेळी बहादुर शहांचं राज्य होतं. गालिब यांचा जन्म एका सैनिकाच्या घरी झाला होता. लहानपणीच गालिब यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलेलं. अगोदर काका आणि नंतर आजी-आजोबांनी गालिबचा सांभाळ केला. गालिब यांचं लग्न वयाच्या १३ व्या वर्षी उमराव बेगमसोबत झालेलं. त्याचं अख्खं आयुष्य दिल्लीत गेलं. महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते. मिर्जा गालिब यांनी पारसी, उर्दू आणि अरबी भाषेत अभ्यास केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments