इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल मोनिका बेलुची हिने नुकताच तिचा ५३ वा वाढदिवस साजरा केला. बºयाचशा हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी मोनिका तब्बल २९३ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. १३ व्या वर्षातच मॉडेलिंग क्षेत्रात आपला जलवा दाखविणाºया मोनिकाने दोन लग्न केले. मात्र तिचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाही. मोनिकाला दोन मुली आहेत. मोनिका जेव्हा २००४ मध्ये प्रेग्नेंट होती, तेव्हा तिने व्हेनिटी फेअर साप्ताहिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याव्यतिरिक्त तिने २०१० मध्ये एका साप्ताहिकासाठी सेमी न्यूड फोटोशूट केले होते. हे शूटदेखील तिने प्रेग्नेंसीदरम्यानच केले होते.
मॉडेलिंगबरोबरच हॉलिवूडपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणाºया मोनिकाने वयाच्या ५१ व्या वर्षी ‘जेम्स बॉण्ड’मध्ये बॉण्ड गर्ल म्हणून भूमिका साकारली. या वयात बॉण्ड गर्लची भूमिका साकारणारी मोनिका पहिलीच अभिनेत्री ठरली. वास्तविक मोनिकाला जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब मिळाल्याने तिला बॉण्डपटात संधी मिळणे स्वाभाविक होते. मोनिकाचा जन्म ३० सप्टेंबर रोजी इटली येथे झाला. १९८८ मध्ये ती युरोपला गेली, पुढे तिने एलिट मॉडेल मॅनेजमेंटबरोबर एक कॉण्ट्रॅक्ट साइन केले. पुढे १९८९ मध्ये ती फॅशन मॉडेलच्या रूपात समोर आली.
मॉडेलिंगबरोबरच तिने फॅशन साप्ताहिकांसाठीही फोटोशूट करण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये तिला मॅन्स हेल्थ साप्ताहिकाकडून शंभर ‘हॉटेस्ट आॅल टाइम वुमन’च्या लिस्टमध्ये सहभागी केले गेले. या यादीत मोनिका २१ व्या क्रमांकावर होती. मॉडेलिंगबरोबर तिने अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावले. त्यासाठी तिने सुरुवातीला अभिनयाचे क्लासेस जॉइन केले होते. वयाच्या २६ व्या वर्षी तिने तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्ये ‘ला रिफा’ आणि १९९२ मध्ये ‘ड्रॅकुला’ या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या. त्यासाठी तिला १९९६ मध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले. २००० मध्ये आलेल्या ‘मलिना’ या चित्रपटातून तिला जगभर प्रसिद्ध मिळाली.