Thursday, June 20, 2024
Homeमनोरंजननितू सिंगने ऋषी कपूर विरोधात दाखल केली होती घरगुती हिंसाचाराची केस

नितू सिंगने ऋषी कपूर विरोधात दाखल केली होती घरगुती हिंसाचाराची केस

ऋषी कपूर आणि नितू सिंग यांची ओळख झाली, त्यावेळी ऋषी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता होता तर नितू केवळ १४ वर्षांची होती. ‘जहरिला इन्सान’ या चित्रपटात त्यांनी दोघांनी सर्वप्रथम एकत्र काम केले. या चित्रपटाच्या सेटवर ऋषी नितूची अनेकवेळा टर उडवत असे, तिच्या खोड्या काढत असे. पण नितूला सतवणाऱ्या या नायकाच्या प्रेमात नितू नकळतपणे कधी पडली हे तिला कळलेच नाही. ऋषीला देखील ती आवडायला लागली. पण त्यावेळी नितूचे वय खूपच लहान असल्याने नितूच्या आईला ती गोष्ट पटत नव्हती. त्यामुळे ती कधीच ऋषी आणि नितूला एकटी कुठेही जाऊ देत नसे. नितूचा एक चुलत भाऊ सतत तिच्यासोबत असे. पण काही वर्षांतच ऋषीने नितूसोबत लग्न करण्याचे ठरवले. लग्नासाठी नितूला मागणी घातली. ऋषीच्या या निर्णयाने नितूची आई खूपच खूश झाली होती. पण नितू ही त्याच्या घरात कमावणारी एकटी असल्याने तिच्या लग्नानंतर तिच्या आईचे काय होणार याची चिंता नितूला सतावत होती. त्यामुळे लग्नानंतर नितूची आई नितूच्याच घरी राहू लागली.

नितू एक खूपच चांगली अभिनेत्री होती. तिने खेल खेल में, रफ्फू चक्कर, कसमे वादे, अमर अकबर अॅन्थोनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. या निर्णयाचा नितूला कधीच पश्चाताप झाला नाही. ऋषी आणि नितूच्या संसारात सगळे काही सुरळीत सुरू होते. पण ऋषीचे दारू पिण्याचे प्रमाण नव्वदीच्या दशकापर्यंत प्रचंड वाढले होते. दारुच्या नशेत ऋषी नितूला मारत असल्यामुळे नितूने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली होती. पण ती लगेचच तिने परत घेतली असल्याची बातमी काही वर्तमानपत्रांनी त्यावेळी दिली होती. तसेच रणबीर कपूरने देखील त्याच्या एका मुलाखतीत मी लहान असताना माझ्या आई-वडिलांमध्ये खूप भांडणं होत असे. मी अनेक रात्री रडून काढल्या आहेत असे सांगितले होते. नितूने देखील तिच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, काही गोष्टींवरती वादविवाद होणे हे प्रत्येक कपलच्या आयुष्यात कधी ना कधी घडत असते. माझ्या आणि ऋषीच्या नात्यात देखील अशा घटना घडल्या आहेत. पण सुदैवाने आज आम्ही आमच्यात असलेले सगळे वाद बाजूला ठेवून आयुष्य आनंदाने घालवत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments