Friday, December 6, 2024
Homeट्रेंडिंगOppo चा ‘प्रीमियम स्मार्टफोन 7,000 रुपयांनी झाला स्वस्त,पाहा फिचर्स

Oppo चा ‘प्रीमियम स्मार्टफोन 7,000 रुपयांनी झाला स्वस्त,पाहा फिचर्स

oppo-find-x2-gets-price-cut-of-rs-7000-in-india-check-new-price-specifications-and-detail
oppo-find-x2-gets-price-cut-of-rs-7000-in-india-check-new-price-specifications-and-detail

स्मार्टफोन कंपनी Oppo ने आपला प्रीमियम स्मार्टफोन Oppo Find X2 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीचा हा दमदार स्मार्टफोन आता 7,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जाणून घेऊया Oppo Find X2 चे फिचर्स आणि नवीन किंमत :

Oppo Find X2 की स्पेसिफिकेशन
Oppo Find X2 मध्ये 6.7 इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारित ColorOS 7.1 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम कार्डचा सोबत असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48MP क्षमतेचा आहे.

तर 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 13MP टेलीफोटो लेन्सचा सपोर्ट मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढच्या बाजूला 32MP चा कॅमेराही आहे. शिवाय 65W SuperVOOC फ्लॅश चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4200mAh क्षमतेची बॅटरी यात आहे. SuperVOOC फ्लॅश चार्जिंगद्वारे हा फोन फक्त 10 मिनिटात 40 टक्के आणि 38 मिनिटात पूर्ण चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे.

Oppo Find X2 नवीन किंमत :-
Oppo Find X2 हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच केला होता. त्यावेळी या फोनची किंमत 64 हजार 990 रुपये होती. पण, आता किंमतीत 7,000 रुपयांची कपात झाल्यामुळे हा फोन 57 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments