Saturday, July 20, 2024
Homeमनोरंजनअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण

अरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण

malaika-arora-get-special-gift-from-arbaaz-khan
malaika-arora-get-special-gift-from-arbaaz-khan

अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमची सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा मलायकाने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पुर्वाश्रमाचा पती अरबाज खानने तिला ते गिफ्ट दिल्याच मलायकाने सांगितले आहे.

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंबे दिसत आहेत. हे आंबे मलायकाला अरबाजने पाठवले आहेत. “आंबे पाठवण्यासाठी धन्यवाद अरबाज” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने त्या व्हिडीओला दिले आहे. आता मलायका आणि अर्जुन हे रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर अरबाजने हे केले नाही ना? असे प्रश्न अनेकांच्या समोर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments