Sunday, May 26, 2024
Homeमनोरंजनमाहिरा खान पुन्हा वादात! ‘वरना’तील रेप सीनमुळे पाकिस्तानात वादंग!!

माहिरा खान पुन्हा वादात! ‘वरना’तील रेप सीनमुळे पाकिस्तानात वादंग!!

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान व अभिनेता रणबीर कपूर या दोघांचे सिगारेट ओढतानाचे फोटो व्हायरल झाले होते.  या  फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावरचे काही लव्ह बाईट्सही कॅमेºयाने टिपले होते. आता हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे  लव्ह बाईट्स  यानंतर जितका काय बोभाटा व्हायचा तो झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते. आता माहिरा पुन्हा  एकदा अडचणीत सापडली आहे.

अर्थात यावेळी कुठल्याही पर्सनल फोटोंमुळे नाही तर तिच्या आगामी चित्रपटामुळे. होय, ‘वरना’ हा माहिराचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. पण मायदेशाच्या भूमीवर साकारलेला माहिराचा हा चित्रपट तिच्या मायदेशीच बॅन होऊ शकतो. होय, पाकिस्तानात माहिराच्या या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे आणि यामागे कारण आहे, यातील एक रेप सीन. ‘वरना’मध्ये माहिराने एका रेप पीडितेची भूमिका साकारली आहे.  पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळवण्यासाठी ‘वरना’ला संघर्ष करावा लागतोय. सिंध बोर्ड आॅफ फिल्म सेन्सॉरने या चित्रपटावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. चित्रपटाचा विषयचं वादग्रस्त आहे.  हा चित्रपट बलात्काराच्या मुद्यावर आहे आणि गव्हर्नरच्या मुलाला या बलात्काराचा आरोपी दाखवण्यात आले आहे. अद्याप चित्रपटावर बंदी लादली गेलेली नाही. रिलीजसाठी चित्रपटाला थोडे सेन्सॉर केले जाऊ शकते, असे या बोर्डाचे जनरल सेक्रेटरी अब्दुल रज्जाक यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी सेन्सॉर बोर्ड आज हा चित्रपट बघून नंतर निर्णय देणार आहे. चित्रपट आम्ही नियम १९८० अंतर्गत यावर निर्णय घेऊ, असे पाकी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष मोबाशीर हसन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी दिग्दर्शक शोएब मंसूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात माहिराशिवाय हारून शाहिद आणि जरार खान लीड रोलमध्ये आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजे १७ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments