करिना कपूर खान आणि सैफ अली खान आज आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करतायेत. मात्र एकवेळ अशी सुद्धा आली होती ज्यावेळी करिना कपूरने सैफ अली खानचा लग्नाचा प्रस्ताव नकारला होता.
सैफ अली खान आणि करिना कपूर टशन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्याजवळ आले होते. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करिना कपूर शाहिद कपूरसोबत जब वी मेट चित्रपटाची शूटिंग देखील करत होता. जब वी मेटच्या शूटिंग करताना दोघांमध्ये खटके उडायला लागल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे करिना कपूर आणि सैफ अली खानमधील जवळीकता वाढत होती. टशन चित्रपटाच्या रिलीजनंतर त्याच्या पुढच्या वर्षी करिना आणि सैफ अली खानेन आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. यानंतर दोघांच्या फॅन्ससोबत कुटुंबीय ही विचारात पडले होते. करिनाची आई बबिताला हे नातं मान्य नव्हते.
एका इंटरव्ह्यू दरम्यान करिनाने हा खुलासा केला होता की, ज्यावेळी सैफ अली खान तिच्याकडे पहिल्यांदा लग्नाचा प्रस्ताव घेऊन होता. त्यावेळी तिने नकार दिला होता. ती म्हणाली त्यावेळी मला करिअरवर फोकस करायचे होते. करिनाने सांगितले सैफकडे मी लग्नासाठी एक अट टाकली होती. लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर ही मी चित्रपटांमध्ये काम करत राहणार. सैफ अली खान आणि करिना कपूर पहिल्यांदा २००३ मध्ये आलेल्या एलओसी चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांतर ते ओमकार आणि टशनमध्ये झळकले होते. मात्र लग्नानंतर आतापर्यंत दोघांनी एकाही चित्रपट एकत्र काम केलेले नाही.
छोटा नबाव तैमूर अली खानचे दर्शन होणार दुर्मिळ! सैफ व करिनाने घेतला मोठा निर्णय!!
लवकरच सैफ आणि करिनाचा मुलगा तैमूर अली खान आपला पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. करिना आणि सैफ त्याच्या बर्थ डेच्या प्लॉनिंगला सुद्धा लागले आहे. स्टारकिड्सच्या लिस्टमध्ये करिना आणि सैफच्या मुलाचा पहिला नंबर आहे. सैफ-करिना पेक्षा मीडियामध्ये त्याचीच चर्चा जास्त असते. नुकतेच करिनाने आपला आगामी वीरे दि वेडिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. यात तिच्यासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर ही दिसणार आहेत.