गांधीनगर– काँग्रेसने विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढवावी अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या गुजरात गौरव महासंमेलनाच्या समारोपासाठी मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. एक महिन्यात त्यांचा हा दुसरा गुजरात दौरा आहे. गुजरात निवडणूक हा मोदींसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळेच एका महिन्यात हा त्यांचा चौथा गुजरात दौरा आहे.
गुजरात गौरव यात्रेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,
– काँग्रेसने देशाला अनेक नेते दिले पण सध्या त्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते.
– काँग्रेसची स्थिती इतकी चांगली होती मग निवडणुकीआधी त्यांचे 25 टक्के आमदार का सोडून गेले ?.
– काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा.
– सरदार पटेलासोबत काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे.
– जीएसटी संबंधी सर्व पक्षांनी मिळून निर्णय घेतला. एकटया काँग्रेसला टीका करण्याचा अधिकार नाही.
– गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेसचा दृष्टीकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे, त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पही पूर्ण केला नाही.
– वंशवाद हरणार, विकासवाद जिंकणार.
– एका बाजूला घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत आणि दुस-या बाजूला विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.
– देशसेवेसाठी भाजपा पूर्णपणे कटिबद्ध आहे, उत्तर प्रदेशच्या विजयासाठी अमित शहांना सामनावीराचा पुरस्कार जातो.
– काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा.
मोदी दुपारी अहमदाबादला पोहोचले. येथून ते गांधीनगरमधील भाट गावात गेले. येथे ते गौरव यात्रेच्या समारोपात सहभागी झाले. या कार्यक्रमात जवळपास ७ लाख लोक सहभागी झाले असल्याचा अंदाज आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अमित शहा उपस्थित आहेत.
१८२ विधानसभा जागा, १४९ मतदारसंघातून गेली गौरव यात्रा
१ ऑक्टोबरपासून सुरु झालेली गुजरात गौरव यात्रा १५ दिवसांमध्ये राज्यातील १८२ मतदारसंघांपैकी १४९ मतदारसंघातून गेली.
– गौरव यात्रेने १५ दिवसांमध्ये ४४७१ किलोमीटर प्रवास केला.
– भाजपचे अनेक केंद्रीय मंत्र्यांसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही या यात्रेत सहभागी झाले होते.
महिन्याभरात चौथ्यांदा मोदी गुजरातला
– गेल्या एक महिन्यात (साधरणतः ३२ दिवसांत) मोदींचा हा चौथा गुजरात दौरा आहे.
– याआधी १४ सप्टेंबरला त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेनची कोलनशिला ठेवली होती.
– त्यानतंर १७ सप्टेंबरला स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते.
-७ ऑक्टोबरला ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. तेव्हा राजकोट, वडनगर आमि गांधीनगर येथे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले होते. काही योजनांचे लोकार्पणही मोदींने केले.
-८ ऑक्टोबरला मोदी त्यांचे गाव वडनगर येथेही गेले होते. याभागात त्यांनी रोड शो केला होता.