मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. याव्यतिरिक्त कंगना नेहमीच भाजप सरकारआणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना दिसते. त्यातच आता कंगनाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
He does not need us we need him, Akhand Bharat needs him,what he needs is probably a little break from all the hostility/negativity he receives on our behalf,he will be pleased to get that break but we need to make sure we get him again as our Prime Minister #India_With_PM_Modi https://t.co/EV3eDtIJ4M
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 10, 2021
भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे सुचविणार्या अहवालाच्या आधारे कंगनाने एक ट्विट केले आहे. कंगनाच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “सस्पेंड होण्याच्या किमतीवर मी जाहिरपणे सांगते की २०२४ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे. २०१४ मध्ये निवडणूक जिंकत नरेंद्र मोदी पहिलांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आणि मोदींचं पंतप्रधान पद कायम राहिलं. यावरूनच कंगनाने हे ट्विट करत २०२४ मध्ये ही नरेंद्र मोदी निवडणूक जिंकत पंतप्रधान असतील असं म्हटलं आहे.
कगंना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.