ठाणे: झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर २०२० मध्ये सुरु असलेल्या वेब सिरीजच्या माध्यमातून सविंधान आणि वाल्मीकी समाज आणि संत रविदास समाजाच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात ठाण्यातील चर्मकार समाजाच्या वतीने वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती ती नंतर वर्ग करून ना. म. जोशी मार्ग लोअर परेल पोलीस स्टेशन मध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबधीत वेबसिरीजचे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्यावर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी चर्मकार समाजाचे नेते भास्कर चव्हाण, संत रोहिदास महाराज सेवा संस्थेचे संस्थापक अशोक जाधव यांनी केली आहे.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसिरीज सुरु आहेत. परंतु झी फाईव्ह या प्लॅटफॉर्मवर २०२० मध्ये माफीया वेब सिरीजमध्ये सविंधान तसेच वाल्मीकी समाजाच्या विरोधात आणि संत रविदास समाजाच्या विरोधात देखील अपशब्द वापरण्यात आले आहेत.
त्यामुळे या समाजात तीव्र संताप उसाळला आहे. त्यामुळे अशा वेब सिरीज बनविणाऱ्यांच्या विरोधात आता ठाण्यातील चर्मकार समाज जागृत झाला आहे. त्यानुसार आता या वेबसिरीजचे दिग्दर्शक विरसा दासगुप्ता, लेखक तसेच निर्माता आणि अभिनेता यांच्या विरोधात अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
जर त्यांना अटक नाही केली तर, महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशात आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी संत रोहिदास महाराज सेवा संस्था संस्थापक अशोक जाधव समाजाचे ज्येष्ठ नेते नारायण गायकवाड, संतोष जाधव, वेंकट कांबळे, बाळासाहेब गायकवाड, सुनिल लोंगरे व सर्व समाज बांधव उपस्थित होते