skip to content
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजनकाजोलचा ‘कमबॅक’!

काजोलचा ‘कमबॅक’!

गेल्या काही दिवसांपासून काजोल कमबॅक करणार, अशी चर्चा आहे आणि आता ही चर्चा खरी ठरताना दिसतेय. ‘मैं हू ना’चे लेखक राजेश साथी यांच्या चित्रपटातून काजोल कमबॅक करणार आहे. म्हणजेच काजोलचा चित्रपट राजेश साथी दिग्दर्शित करणार, अशी चर्चा होती. हा चित्रपट अजय देवगणच्या फिल्म्सअंतर्गत साकारण्यात येणार, असेही सांगितले गेले होते. काजोलचा हा चित्रपट आनंद गांधी यांच्या ‘बेटा कागडू’ या नाटकावर आधारित असल्याचेही बोलले गेले होते. पण काजोलने आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत, खरे काय ते सांगितले आहे. होय, काजोल कमबॅक करणार, हे खरे आहे. पण ती राजेश साथी यांच्या चित्रपटातून नव्हे तर प्रदीप सरकार यांच्या चित्रपटातून. खुद्द काजोलनेच ही माहिती दिली.

माझा चित्रपट प्रदीप सरकार दिग्दर्शित करणार. हा चित्रपट आमच्या होम प्रॉडक्शनअंतर्गत बनवला जाणार. यापेक्षा अधिक माहिती मी सध्या तरी देऊ शकत नाही, असे काजोल म्हणाली. काजोल शेवटची रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’मध्ये दिसली होती. या चित्रपटाकडून काजोलला बºयाच अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दणकून आपटला होता. यानंतर रोहितने काजोलचा पती अर्थात अजय देवगणसोबत ‘गोलमान अगेन’ हा चित्रपट केला होता. ‘गोलमाल अगेन’ने २०० कोटींची कमाई करत, मोठे यश मिळवले होते. याबद्दलही काजोल बोलली. ‘गोलमाल अगेन’मलाही आवडला. मी प्रेक्षकांच्या निर्णयांचा आदर करते. बाकी मी काय म्हणू शकते, असे ती म्हणाली.
अलीकडे काजोलने कोलकाता फिल्म्स फेस्टिवलच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. या सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन, साऊथचा सुपरस्टार कमल हासन आणि किंगखान शाहरूख खान असे सगळे उपस्थित होते. या सोहळ्याच्या मंजावर काजोल व शाहरूख दोघेही धम्माल मस्ती करताना दिसले होते. हा अनुभव कसा होता? असे काजोलला विचारण्यात आले. यावर अतिशय सुंदर अनुभव असे काजोल म्हणाली. अमिताभ बच्चन व कमल हासन दोघेही माझे आवडते अभिनेते आहेत. त्यांना एकत्र पाहणे एक सुंदर अनुभव होता, असे काजोल म्हणाली. अर्थात यावेळी तिने शाहरूखचा उल्लेख टाळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments