फ्रिज प्रत्येक कुटुंबातील अविभाज्य भाग बनला आहे. फळे, भाजीपाला, दुध, दही, शितपेय यासारख्या खाण्यापिण्याच्या अनेक वस्तू ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. पण त्याची वेळच्यावेळी साफसफाई करणेही तितकेच गरजेचे आहे.
१) दोन आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रिजची साफसफाई करावी.
२) फ्रिज धुण्यापूर्वी त्याला बंद करावा. त्यातील खराब किंवा नको असलेले सामान फेकून द्या.
३) साफसफाई करताना लिंबाचा रस व पाणी एकत्र करून वापरल्यास फ्रिजला दुर्गंधी येत नाही.
४) दही किंवा दूध जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्याने वास पसरतो. अशावेळी वाटीत चुना घेऊन तो फ्रिजमध्ये ठेवावा.
५) कॉफी बीन्स एका वाटीत घेऊन फ्रिजमध्ये ठेवल्याने दुर्गंधी नष्ट होऊन कॉफीचा सुगंध पसरू लागतो.
६) खाण्याचा सोडा व पाणी एकत्र करून फ्रिज स्वच्छ करावा.
७) फ्रीजमध्ये खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा) ठेवल्यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी नष्ट होते.
८) फ्रिजमध्ये लिंबू किंवा संत्र्याच्या साली कापून ठेवा. हे पदार्थ फ्रिजमधील वास शोषून घेतात.
९) फ्रिजच्या दाराच्या रबरी गास्केटला टॅल्कम पावडर लावून गास्केट कोरड्या कपड्याने पुसून घ्यावे.
१०) फ्रिज धुतल्यानंतर त्याला व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसावे.