Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनअखेर 'पद्मावत'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

अखेर ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

पद्मावती चित्रपट सुरुवातीला डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, वाद निर्माण झाल्याने प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. त्यांनी चित्रपटात सूचवलेल्या पाच सुधारणा केल्यानंतर यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर आता पद्मावतया नावाने चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित पॅडमॅनही चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. त्यामुळं यापैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. पद्मावती सिनेमाच्या पोस्टर आणि नंतर ट्रेलर लॉन्चपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. विविध राजपूत संघटनांनी भन्साळींच्या या भव्य सिनेमाला विरोध करत त्यात सहभागी कलाकारांना धमकावलंसुद्धा. राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृती मलीन करत हा सिनेमा साकारण्यात आला असल्याचा आरोप अनेकांनी लावला.

काय आहेत बदल 
केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत. सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.

राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. सूचवलेले बदल चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा असे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments