Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजनसई मांजरेकरचा ‘हा’ लूक तुम्ही बघितला का?

सई मांजरेकरचा ‘हा’ लूक तुम्ही बघितला का?

 

निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकरने ‘दबंग ३’ या चित्रपटातून पदार्पण केल्यापासून सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो, व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. चाहत्यांकडून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडतो. तिने नऊवारी साडीतला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमधील सईचा अस्सल मराठमोळा लूक पाहून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा घायाळ झाले आहेत. आपल्यासाठी आम्ही तो फोटो आपल्यासाठी दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Navrai Majhi Laada Chi 👯‍♀️

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर टिकली, झुमके असा पारंपरिक वेश तिने केला आहे. एका लग्नात जाण्यासाठी सईने ही सर्व तयारी केली आहे. सईने आईसोबतचाही एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मेधा मांजरेकरसुद्धा मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.

सईने पहिल्याच चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. ‘दबंग ३’मध्ये तिने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला पण सईच्या अभिनय कौशल्याची चर्चा सर्वत्र झाली. आता पुन्हा नवीन लूकमुळे सई चर्चेत आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments