Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनदीपिका ‘या’ तरुणींसोबत वाढदिवस साजरा करणार

दीपिका ‘या’ तरुणींसोबत वाढदिवस साजरा करणार

Deepika Padukoneबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दरवर्षी तिचा वाढदिवस रणवीर सिंगसोबत साजरा करते. परंतु यंदाचा प्लॅन वेगळाच आहे. सध्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारीत आहे. ५ जानेवारीला दीपिका ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे दीपिका अॅसिड हल्ला पीडित तरुणींसोबत साजरा करण्याचं तिनं ठरवलंय.

मेघना गुलजार यांनी ‘छपाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सगळ्या व्यग्र वेळापत्रकात एक आनंदाची गोष्ट म्हणजे ५ जानेवारीला दीपिका तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरवर्षी दीपिका तिचा वाढदिवस रणवीर सिंगसोबत साजरा करते. पण यावेळी तिने काही वेगळेच प्लॅन आखले आहेत. या वाढदिवसाला मोठी पार्टी देण्याऐवजी तो दिवस अॅसिड हल्ला पीडित तरुणींसोबत साजरा करण्याचं तिनं ठरवलंय. दीपिका तिचा ३४ वा वाढदिवस लखनऊ येथील शिरोज कॅफेला उपस्थित राहणार आहे. अॅसीड पीडित महिला मिळून हा कॅफे चालवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments