मुंबई : बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे तीन खान एकच चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ पुढच्या वर्षी 2020 मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात बॉलिवूडचे तिनही कान सोबत झळकणार आहेत. आमिरच्या या सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. आमिरने या सिनेमात शाहरुख खानसाठी एक स्पेशल रोल ठेवण्यात आला आहे. ही कुठला कॅमियो रोल नसून एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे, जी सिनेमासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
शाहरुख व्यतिरिक्त आमिर सलमान खानलाही या सिनेमात घेण्याच्या विचारात आहे. आमिर खानला त्याच्या या सिनेमात तिन्ही खान एकत्र दाखवण्याची इच्छा आहे. अशीही माहिती समोर येत आहे. सलमान खानसाठीही आमिरने एक महत्त्वाची भूमिका राखून ठेवली आहे.
शाहरुखने त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमातील भूमिकेबाबत सांगितलं आहे, मात्र, अद्याप सलमान खानने या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिलेला नाही. या सिनेमाची काहाणी अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. तर ‘सीक्रेट सुपरस्टार’ सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तिन्ही खानच्या चाहत्यांना आता या चित्रपटाची वाट बघावी लागणार आहे.