Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौ-यावर; सत्तास्थापनेचा मुहूर्त लागेना!

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौ-यावर; सत्तास्थापनेचा मुहूर्त लागेना!

shiv sena bjp alliance and government formation discussion Uddhav Thackeray Devendra Fadnavis
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज अकरा दिवस उलटले. मतदारांनी युतीला कौल दिला. पंरतु दोन्ही पक्षांमधील संघार्षामुळे सत्तास्थापनासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज विदर्भ आणि मराठवाडा भागात शेतक-यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.

अवकाळी पावसामुळे राज्यातील 325 तालुक्यांमध्ये 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहेत. अकरा दिवस उलटले सरकार स्थापन झाले नाही. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी हवालदील झाला आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. शिवसेना भाजपामध्ये सत्तेच्या वाटपावरून संघर्ष सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला नाही. असा सवाल वारंवार उपस्थितीत करण्यात येत आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस अकोल जिल्ह्यात तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात अद्यापही सत्तास्थापन करण्यावरून चर्चा झाली नाही. मात्र राज्याला सरकार कधी मिळेल याचीच चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments