अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाले असले तरी अनेक पार्ट्यांमध्ये, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसतात. तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघेही एकत्र पार पाडताना दिसतात. नुकतंच या दोघांनी मुलगा अरहानचा वाढदिवस एकत्र साजरा केला. अरहानचा १५ वा वाढदिवस नुकताच साजरा केला गेला. या सेलिब्रेशनचे काही फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले.
‘माझा मुलगा आता मोठा झाला आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. विभक्त होण्यापूर्वीच अरबाज आणि मलायका यांनी वेगळं राहणं सुरू केलं होतं. दोघांच्या विभक्त होण्याच्या जेवढ्या चर्चा रंगल्या तेवढ्याच चर्चा ही जोडी एकत्र दिसल्यानंतर रंगल्या. ही जोडी जेव्हा एकत्र दिसते त्यावेळी दोघांच्यातील दुरावा कमी झाला, अशा चर्चा नेहमीच रंगताना दिसतात.