Thursday, June 20, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेआता शाकाहारी विद्यार्थ्यालाच मिळणार गोल्ड मेडल, विद्यापीठाचा अजब फतवा

आता शाकाहारी विद्यार्थ्यालाच मिळणार गोल्ड मेडल, विद्यापीठाचा अजब फतवा

महत्वाचे….
१.१५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत २. विद्यार्थी हा शाकाहरी पाहिजे ३. सावित्रीबाई फुले पुणे विघापीठाच्या फतव्याने गोंधळ


पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सूवर्णपदक (गोल्ड मेडल) देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट ठेवण्यात आली आहे.

परिणामी पुणे विद्यापीठात शाकाहारी विद्यार्थ्यालाच सूवर्णपदक मिळू शकते. असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

अजब अटी…१५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

– १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असतील.
– विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा.
– ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य असेल.
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा.
– रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रण कार्य, साक्षरता व स्वच्छता मोहीम तसेच एड्‍स रोगाविरुद्ध जनजागरण मोहीम आदीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असावा.
– पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी उपलब्ध नसल्यास पदवी अभ्यासक्रमाच्या विघार्थ्याचा विचार करण्‍यात येईल.
– सूवर्ण पदकास पात्र असणाण्‍या विद्यार्थ्याला अध्यादेश क्र.१०९, ११० व १४३ ची पूर्तता करणे आवश्यक आहे.
– अध्यादेश क्र.१६८ नुसार परीक्षेस बसणारा विद्यार्थी सूवर्णपदकास पात्र ठरणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments