Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनअमिताभ यांना हा चित्रटपट समजलाच नाही!

अमिताभ यांना हा चित्रटपट समजलाच नाही!

दिग्गज अभिेनेता अमिताभ बच्चन यांनी अॅवेंजर्स : इन्फिनीटी वॉरहा चित्रपट पाहिला. पण तो चित्रपट समजला नसल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. अमिताभ यांनी चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, ”अच्छा भाईसाहब, वाईट वाटून घेऊ नका. अॅवेंजर्स नावाचा चित्रपट पाहायला गेलो होतो. पण चित्रपटात काय घडतंय तेच समजत नव्हते.”

अँथोनी आणि जो रूसो यांनी ‘अॅवेंजर्स : इन्फिनीटी वॉर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मारवेल सिनेमेटिक यूनिवर्सचा हा १९ वा चित्रपट आहे.

सुपरहिरोंचा चित्रपट असलेल्या ‘अॅवेंजर्स : इन्फिनीटी वॉर’मध्ये आयर्न मॅन, थोर, हल्क, स्पायडर मॅन, डॉ. स्ट्रेंज आणि अनेक अॅवेंजर्स सर्वात शक्तीशाली व्हिलन थानोस याचा पराभव करण्यासाठी एकत्र येतात असा विषय यात हाताळण्यात आलाय.

‘अॅवेंजर्स : इन्फिनीटी वॉर’ चित्रपटात रॉबर्ट डॉनी जूनियर, जोश ब्रोलिन, क्रिस हॅम्सवर्थ, क्रिस इवांस, मार्क रफेलो, स्कारलेट जोहानसन, सॅमुअल एल जॅक्सन, क्रिस प्रैट, जो सलदाना, डेव बॉतिस्ता, डॉन चेडल, सेबेस्टियन स्टेन, एलिझाबेथ ओल्सन, टॉम हॉलँड, बेनेडिक्ट कम्बरबॅच आणि टॉम हिडलस्टन या कलाकारांच्या भूमिका आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments