ताल या चित्रपटाने ऐश्वर्याचे करियर संपूर्णपणे बदलून गेले. ताल या चित्रपटात ऐश्वर्याने साकारलेली मानसी ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. ताल या चित्रपटाच्या बाबतीत चांगलीच कोन्ट्रोव्हर्सी घडली होती. आज इतके वर्षं झाले तरी ती कोन्ट्रोव्हर्सी कोणीही विसरू शकलेले नाही. ताल या चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या कास्टिंग काऊचची बळी पडली असल्याचे बॉलिवूड आजकल या वेबसाईटने म्हटले होते. त्यांच्या रिपोर्टनुसार ताल या चित्रपटात मनिषा कोईराला मुख्य भूमिकेत होती. पण ऐश्वर्याने सुभाष घईला सेक्शुअल फेव्हर दिले असल्याने तिला हा चित्रपट मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यानुसार शक्ती कपूरनेच एका स्टिंग ऑपरेशनमध्ये ही गोष्ट सांगितली होती.
ऐश्वर्या राय ही जगातील सगळ्यांत सौंदर्यवान स्त्री मानली जाते. तिने मिस वर्ल्ड हा किताब मिळवला आहे. मिस वर्ल्ड बनल्यानंतर ऐश्वर्याने अभिनय क्षेत्रात आपले भाग्य आजमवायचे ठरवले आणि इरूवार या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने प्यार हो गया, आ अब लौट चले यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पण या चित्रपटांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार अनेक वर्षांपूर्वी शक्ती कपूरसोबत एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. यात त्याने सुभाष घई, ऐश्वर्या आणि ताल चित्रपटाचा उल्लेख केला होता. ऐश्वर्याला ताल हा चित्रपट कसा मिळाला याविषयी त्याने त्यात म्हटले होते. पण शक्ती कपूरने त्याच्यासोबत असे कोणतीच गोष्टी झाली नव्हती. या सगळ्यात त्याला अडकवले गेल्याचे नंतर स्टेटमेंट दिले होते. तर एमटिव्ही इंडिया या वेबसाईटने देखील कास्टिंग काऊच प्रकरणाबद्दल बातमी दिली होती.
ताल या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर हा वाद चांगलाच रंगला होता. पण काही काळानंतर हे प्रकरण शांत झाले. सुभाष घई किंवा ऐश्वर्या रायने याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. त्यावेळी खऱेच काही घडले होते की केवळ ऐश्वर्या आणि सुभाष यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर हे आरोप लावण्यात आले होते हे केवळ ते दोघेच सांगू शकतात.