Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री नेहा पेंडसे रविवारी विवाहबंधनात अडकणार

अभिनेत्री नेहा पेंडसे रविवारी विवाहबंधनात अडकणार

Neha Pendse Marriage,Neha, Pendse, Marriageमुंबई : मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात लगीनघाई सुरु झाली आहे. ५ जानेवारीला नेहा प्रियकर शार्दुल सिंहसोबत पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. नेहाने इन्स्टाग्रामवरुन लग्नाआधीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत. यामुळे नेहाच्या चाहत्यांचे तिच्या विवाहकडे लक्ष लागले आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेचा डोक्याला मुंडावळ्या बांधलेला नेहाचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर वायरल झाला आहे. चाहत्यांनी नेहाला शुभेच्छा देतानाच तिचं कौतुकही केलं आहे. नेहाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. मिलानमधील कॅथेड्रलसमोर शार्दुलचा हात धरुन डोळ्यात डोळे घालत असतानाचा फोटो नेहाने ऑगस्ट महिन्यात शेअर केला होता. त्यानंतर नेहाने गुपचूप साखरपुडा केला होता. त्याचीही चर्चा रंगली होती.

मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. १९९६ मधील ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. ‘प्यार कोई खेल नही’, ‘देवदास’, ‘दिल तो बच्चा है जी ‘ अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. त्याचप्रमाणे नेहा पेंडसे ‘बिग बॉस १२’मध्ये झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही तिने मजल मारली होती. ‘टुरिंग टॉकिज’, ‘बाळकडू’, ‘नटसम्राट’ अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments